घरोघरी तिरंगा अभियानात ठामपातर्फे

ठाणे : स्वात्रंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे गुरूवार, १५ ऑगस्टला सकाळी ६.०० वाजता तिरंगा मॅरेथॉन, सायकल आणि बाईक यांची तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयासमोरून या मॅरेथॉन आणि रॅलीला प्रारंभ होणार आहे.
१५ वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी तीन किमीची मॅरेथॉन, १५ वर्षावरील मुले आणि मुलींसाठी पाच किमीची मॅरेथॉन होईल. मॅरेथॉन सकाळी सात वाजता सुरू होईल. सायकल आणि बायकर्स रॅली ही खुल्या गटासाठी आहे. त्यात ५ किमी आणि १० किमी असे दोन गट असतील. बायकर्स रॅली स. ६ वाजता तर सायकल रॅली स. ६.३० वाजता सुरू होईल, अशी माहिती क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी दिली.ठाणे जिल्हा अॅथलेटीक्स संघटना, महापालिकेचे सर्व विभाग, पोलीस आणि वाहतूक पोलीस,आम्ही सायकल प्रेमी, राईड फॉर कॉज अॅथलेटिक असोसिएशन, ठाण्यातील विविध हौशी सायकल संघटना आणि बायकर्स गट यांच्या सहकार्याने या तिरंगा मॅरेथॉन आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. त्यात ठाणेकरांनी उस्त्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्याकडील राष्ट्रध्वज १३ ते १५ ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *