आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे दरवर्षी शहरातून भारतीय नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागतयात्रेच्या मार्गावर आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी, ६ एप्रिल रोजी नौपाडा परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शनिवारी नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, मासुंदा तलाव परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभागसमितीनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शहरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील प्रदुषण कमी होण्यास निश्चितच मदत झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते याचबरोबर पूर्वद्रुतगती मार्गांवरील स्वच्छता देखील टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ठाणे महानगरपालिका आणि श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे दरवर्षी शहरातून भारतीय नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. याच पार्श्वभूमीवर नौपाडा परिसरात ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेची सुरूवात श्रीकौपिनेश्वर मंदिरापासून होणार आहे. शनिवारी, ६ एप्रिल सकाळी ६.३० वाजल्यापासून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ होणार असून महापालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच नागरिक देखील सहभागी होणार आहेत. मंदिर परिसर, तसेच मंदिराच्या शेजारील भाजीमंडई परिसर, जांभळीनाका परिसर, मासुंदा तलाव परिसर आदी ठिकाणी साफसफाई या मोहिमेत केली जाणार आहे.
