ठाणे : ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभागसमिती अतिक्रमण निष्कासन विभागाच्यावतीने संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २१७ आस्थापनांना भेटी देवून १०६.५४ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण ८४ हजार ३०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 21 आस्थापनांना भेटी देवून 02 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 4 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 15 आस्थापनांना भेटी देवून 02 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 3 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेट देवून 58.84 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 15 हजारांचा दंड आकारण्यात आला. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 25 आस्थापनांना भेटी देवून 5.7 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 9 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 15 हजारांचा इतका दंड वसूल करण्यात आला. वागळे इस्टेट व लोकमान्य प्रभाग समिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 8 हजार 300 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 15 आस्थापनांना भेटी देवून 4 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 10 हजार रु दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 42 आस्थापनांना भेटी देवून एकूण 18 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 19 हजारांचा इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
00000
