माथेरान : माथेरान हे मुंबई पुणे नाशिक ठाणे सारख्या मोठ्या शहरांपासून सर्वात जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी वाढत आहे व येथे येण्यासाठी नेरळ माथेरान हा एकमेव घाटमार्ग उपलब्ध आहे व वीकेंड तसेच सलग लागून आलेल्या सुट्टीच्या दिवशी घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असते व काही नवखे चालकांचे ह्या वाहतूक कोंडी मध्ये गाडीवरील नियंत्रण सुटून अनेकवेळा अपघात होत आहेत, ह्यावर्षी त्यामध्ये जास्तच भर पडली असून घाटामध्ये अपघातांन मध्ये वाढ झाली आहे.
माथेरान करता येण्याकरिता नेरळ येथून एकमेव घाट मार्ग उपलब्ध आहे , या मार्गाचे नूतनीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आल्यानंतर हा घाट थोडा सुस्थितीमध्ये आला परंतु या मार्गावर असलेली अवघड वळणे तीव्र चढउतार व अरुंद रस्ता हा नवशिक्या चालकांसाठी डोकेदुखी ठरत असून यावर्षी नेरळ माथेरान घाटामध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे या दोन वर्षांमध्ये अनेकांना आपले जीव गमववे लागले असून त्यामध्ये दुचाकी चालक यांचे प्रमाण अधिक आहे
तर येतील वॉटर पाईप रेल्वे स्थानका खालील तीव्र उताराच्या वळणावर सातत्याने अपघात होत असून हे वळण आता अपघातासाठी ओळखले जात आहे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी एक तरी अपघात होत असतो त्यामुळे येथे कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी मागणी समस्त माथेरान कर करीत आहेत.
नेरळ माथेरान घाटामध्ये वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या झाली आहे यातून वाट काढताना बाहेरील खाजगी चालकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत असते नेरळ माथेरान मार्गावर चालणाऱ्या पर्यटक गाड्या यांच्या मधून वाट काढताना खाजगी चालकांची दमछाक होत असते हा रस्ताही अरुंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये या चालकांची परीक्षाच होत आहे त्यामुळेच माथेरान करिता पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा अशी मागणी माथेरानकर सातत्याने करीत आले परंतु त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याने हे अपघात वाढत जाणार हे मात्र निश्चित आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *