मुंबई: बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये दोन लहान विद्यार्थींनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. उपेंद्रजी शेंडे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने ह्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चे राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे
राज्यातील ठिक ठिकाणी सातत्याने महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची समजून राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत बदलापूर येथील दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याने बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती भविष्यात अशा घटनांबाबत कारवाई करताना दिरंगाई होणार नाही तसेच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले पाहिजे अशी ठोस उपाययोजना राज्य सरकारने केली पाहिजे अशी अपेक्षा भाऊ निरभवणे यांनी व्यक्त केली आहे.
