राजीव चंदने

 

मुरबाड : बदलापूर शहरातील आदर्श विदयालयातील विध्यार्थीनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुरबाड मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आले होते.
बदलापूर येथील तीन वर्षाच्या अल्पवयीन विध्यार्थीनींवर त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. ह्या घटनेच्या निषेधार्थ मुरबाड शहरातील विदयालय महाविद्यालय जि. प. शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, व पालक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत जनआक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या क्रूर घटनेचा संताप व्यक्त करत मुरबाड मधून विविध सामाजिक, राजकीय, संघटना व तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांची भेट घेऊन निवेदने दिले. या अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे,दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारा सोबत बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी गलिच्छ व अपशब्दाचा वापर केल्याचा हि निषेध व्यक्त केला आहे. तसेच मुरबाड शहरातील खासगी व मोठ्या शाळांमधील सफाई कर्मचारी, स्कुल बस, वाहन चालक, त्यांचे मदतनीस, वॉचमन यांची ओळखपत्रे संबंधित शाळांकडून मागवून तथा अशा दुर्दैवी घटना टाळण्याकरिता संबंधित शाळांना भेट देण्याबाबत नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *