नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर पासून दिघा विभागापर्यंत रस्त्याच्या कडेला व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या, PUC गाड्या, खादय पदार्थ टेम्पो, पान टपरी, वडा पाव काउंटर, गॅस सिलेंडर, आईसक्रीम गाडया, थ्री व्हिलर टेम्पो, इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर दि.21/08/2024 रोजी नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग विभाग कार्यालय यांचे मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची करवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान दि.21/08/2024 रोजी कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी विभाग कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *