अशोक गायकवाड

 

रायगड : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, गुणवत्ता वाढ व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शाळेचा सर्वागीण विकास करणे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा कालावधी २९ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ हा ठरविण्यात आला आहे. या अभियानाच्या टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे पुढील मुद्दयांच्या आधारे गुणांकन करण्यात येईल. पायाभूत सुविधा ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादणूक ४३ गुण.
तालुकास्तरावरील मुल्यांकनाचे कार्य- प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत. पारितोषिके:- तालुकास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, द्वितीय क्रमांक ३ लक्ष, तृतीयक्रमांक- ३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, व्द्वितीय क्रमांक २ लक्ष, तृतीयक्रमांक १ लक्ष. जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीय क्रमांक -३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीयक्रमांक ३ लक्ष, अशाप्रकारे रायगड जिल्हयात बक्षिसे मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *