अशोक गायकवाड

 

रायगड : ‘रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन’ च्यावतीने शनिवार, २४ ऑगस्टला सकाळी ११.०० वाजता क्षात्रैक्य सभागृह, कुरुळ-अलिबाग येथे मा.न्यायमूर्ती अभय ओक (न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायलय, नवी दिल्ली) यांचे, ‘जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे.
या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती आर.आय. छागला (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.न्यायमूर्ती एम.एम.साठ्ये (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.ए. एस. राजंदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड उपस्थित राहणार आहेत. तर विशेष निमंत्रित म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पदाधिकारी अॅड. जयंत जायभावे, अध्यक्ष, अॅड. डॉ.उदय वारुंजीकर उपाध्यक्ष, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.गजानन चव्हाण, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *