मुंबई : टांकसाळ मजदूर सभेची वार्षिक सर्वधारण सभा टांकसाळमध्ये पार पडली. या सभेमध्ये संघटनेची नवीन कार्यकरिणी बिनविरोध निवडण्यात आली. यात टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांची फेरनिवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी विद्याधर राणे, मुकुंद वाजे, जनरल सेक्रेटरीपदी आणि उपाध्यक्षपदी संजय सावंत, खजिनदारपदी मिलिंद जाधव, उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी, राजेंद्र महाडिक, विश्वास माने, संजय येलकर, अविनाश घोडके यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे टांकसाळमधील कामगारांनी अभिनंदन केले
भारतातील महत्त्वपूर्ण अशा उद्योगात नाणी छपाई करणाऱ्या एकूण चार टांकसाळींपैकी दक्षिण मुंबई येथील “भारत सरकार टांकसाळ, मुंबई” ही एक प्रमुख टांकसाळ आहे. १८२९ स्थापन झालेली ही टांकसाळ येत्या पाच वर्षात आपल्या स्थापनेची २०० वर्षे पूर्ण करत आहे. देशाच्या व मुंबईच्या विकासात या उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई टांकसाळ मध्ये “हिंद मजदूर सभा” या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असणाऱ्या “टांकसाळ मजदूर सभा” या कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. कॉ. अशोक मेहता आणि कॉ. एफ.एम. पिंटो यांनी या संघटनेची स्थापना केली . टांकसाळ मजदूर सभा ही अमृत महोत्सव साजरी करणारी मुंबई टांकसाळमधील एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना आहे. २२ ऑगस्ट २०२४ रोजी या संघटनेची वार्षिक सर्वधारण सभा टांकसाळमध्ये पार पडली.
00000
