स्वीडनमध्ये मोठ्या थाटात रंगला मंगळागौरीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित केला गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळ यांनी. गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे यावर्षीही हा कार्यक्रम आयोजित केला आणि यापुढेही नक्कीच करत राहतील, असं मंडळाच्या अध्यक्षा प्रणाली मानकर पतके म्हणाल्या.