रमेश औताडे
मुंबई :विशेष अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्नेहांकित हेल्पलाईन या सामाजिक संस्थेमार्फत मार्फत नवीन शिक्षण पद्धती या विषयावर परिषद आयोजित केली आहे.अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा परिमला भट यांनी दिली.
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता नवीन शिक्षण पद्धती कशी लागू करता येईल याबाबत चर्चासत्र व सूचना या परिषदेच्या माध्यमातुन शासनास सादर करण्यात येणार आहेत. नेहांकित हेल्पलाईन ही संस्था मागील २३ वर्षांपासून अंध युवकांना शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरावर मार्गदर्शन करत आहे. विलेपार्ले पूर्व मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता परिषद २५ ऑगस्ट रोजी उत्कर्ष मंडळ हॉल, विलेपार्ले पूर्व, मुंबई येथे होत आहे.
माधव गोरे व योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण, त्याची ओळख व ते अंधांकरिता कसे राबविता येईल याबाबत एक सत्र आहे. विविध क्षेत्रातील जाणकार व अनुभवी आपले अभ्यासपूर्वक विश्लेषण करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशी असून यात प्रत्येक टप्प्यावर विविध शाळांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावे याबाबत माहिती मिळणार आहे . नवीन धोरण अंधशाळांकरिता देखील शासनाने लागू करावे. तसेच स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेमार्फत अभ्यासपूर्वक सर्व शाळांच्या सहमतीने प्रस्ताव या परिषदेत सादर करण्यात येणार आहे.असे डॉ माधव गोरे यांनी सांगितले.