रायगड :आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा यासाठी बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त, महिला व बाल विकास डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *