रमेश औताडे
मुंबई :नेते जे म्हणतील ती पुर्व दिशा तो काळ गेला. आता कार्यकर्ते निर्णय घेतील तिच राजकीय दिशा ठरणार. कार्यकर्त्यांची ताकद राजकीय अस्तित्व निर्माण करणार असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील शहिद भिम सैनिक स्मारक येथिल सभागृहात आयोजित पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश प्रभारी विकास काटे होते तर प्रमुख पाहुणे उद्धव तायडे , दलित पँथरचे सुखदेव दांडगे, राहुल गांधी ब्रिगेड चे राजेंद्र पनीकर, ज्योती व्हटकर, उल्हास पवार युवा काँग्रेस, वाल्मिकी मोर्चा चे बंलवत चावरीया,विजय पंडित युवा मोर्चा चे स्मितेश कदम उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आनंद गोरे यांनी पुष्पहार अर्पण केला तर पौर्णिमा पाईकराव यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दुपारगडे यांनी केले.
बागडे पुढे म्हणाले, सर्वाच प्रस्थापित नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या उपयोग करून घेतला व त्यांना वाऱ्यावर सोडले स्वतः मालेमाल झाले. जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ आली तेव्हा यांनी आपल्या परिवाराला खुर्चीवर बसवले. त्यामुळे कार्यकर्ते दुर फेकले गेले आज त्यांचा वाली कोणी नाही. परंतु आता त्यांच्या अंत पाहू नका असा इशारा बागडे यांनी दिला.
राजु सोनवणे संजोग शिवचरण, सन्नी वाघेला, दिना बेन वाघेला गौतम म्हस्के,निलम सोलंकी, गुंडू रंगारी, प्रफुल्ल इंगोले,अजय तायडे, अनिल बनसोडे, रुपाली कांबळे,मंजु लगाडे, शारदा केदारे, सुनिता टपाल, कोजागिरी खरात, संगिता जैस्वार, सारिका लोखंडे लक्ष्मी अहिरे, यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली असे दिलिप कदम यांनी सांगितले.
0000