ठाणे : यंदाच्या शालांत परीक्षेत ९७.४० टक्के एवढे गुण संपादन करत ठाणे शहरात सर्वप्रथम आल्याबद्दल दुर्गा भाऊ जाधव हिला श्री आनंद भरती समाजाच्या ११४ गणेशोत्सवात होणाऱ्या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभात ७३ वे कै. य.ल.नाखवा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात संस्थेत गुणानुक्रमे पहिला आल्याबद्दल ९०.४० गुण मिळवणाऱ्या आर्यन दुर्गेश डोलकर ह्याला कै द.पा. नाखवा स्मृती पारितोषीक देऊन गौरवणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी यांनी सांगितले.
श्री आनंद भरती समाजाचा ११४ वा गणेशोत्सव ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान संस्थेच्या सभागृहात साजरा करण्यात येणार आहे.त्यादरम्यान संस्थेच्या वतीने दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन कर्नाय्त आले असून वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पारितोषिक वितरण समारंभास शिक्षणातद्य कविता देशपांडे-रेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात पीएच डी पदवी संपादन केल्याबद्दल माजी उपाध्यक्ष दिलीप नाखवा, सनदी लेखापालची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिषेक गुप्ता आणि मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवणाऱ्या सोफिया कोळी यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात येईल.
0000
