रमेश औताडे

मुंबई :दिव्यांग आर्मी ऑफिसर कॅप्टन अनंत निकम मु पो कुळवंडी तालूक खेड जि रत्नागिरी यांना कॅप्टन पदाचे ओळखपत्र देणे व कॅप्टन पदाचे पी पी ओ आदेश देवून इतर लाभ जिल्हा सैनिक बोर्ड रत्नागिरी यांनी देणे बाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालय यांनी ३ फेब्रुवारी २००९ रोजी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने कॅप्टन अनंत निकम यांना ५८,९३.४५३ रुपये १० पैसे तसेच १८ टक्के व्याज देणे मागणी केलेल्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. तरीही न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.
तसेच राष्ट्रपती, राज्यपाल, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालय रत्नागिरी खेड, कनिष्ठ न्यायालय खेड रत्नागिरी, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, राज्य माहिती आयोग मुंबई, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम या सर्वांचे आदेश निर्देश असून सार्वजनिक प्रशासन विभाग २८ अवर सचिव उर्मिला सावंत यांच्याकडून अती तात्काळ खास बाब म्हणून भारतीय संविधान कलम ३०० क, कलम १६३ ( २ ) व कलम १६६ ( १ ) ( २ ) , कलम २१ जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण येणे प्रमाणे आहे असे माजी कॅप्टन अनंत निकम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *