ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला अशी माहिती शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली.
शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या मॅरेथॉन चे आयोजन केले होते. सलग पाच वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपतालुका प्रमुख बंडू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाच गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत महिला खुल्या गटात १) प्रीती भाके २) शिवानी गोरे ३)साक्षी मोरे
पुरुष खुल्या गटात १) अभिषेक आगरे २) साहील वालूनू ३) अशान यादव दोन किलोमीटर विद्यार्थी गटात १)अथर्व दुर्गावणे २)गौरेश भोसले ३)आकाश शिंदे , मुली १)पूजा यादव २)अश्विनी यादव ३) सिमरन गुप्ता, दीड किलोमीटर मुले १)प्रिन्स राय २)किशन निषाद ३)तनिष यादव मुली १)गार्गी गुप्ता २)मनस्वी जयस्वाल ३)सरस्वती सिंग, एक किलोमीटर विद्यार्थी १)निखिल दळवी २)गणेश काजबळे ३दिव्यांश पांडे, मुली १)रिया करंबळे २)पलक पटवा ३)ज्योती यादव
या विजेत्यांनी क्रमांक पटकावले. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला सहभागी होणाऱ्या खेळाडूंसहित दिवेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव, नगरसेविका दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख आदेश भगत, गणेश मुंडे, युवती शहर अधिकारी साक्षी मढवी, विभाग प्रमुख उमेश भगत, चरणदास म्हात्रे, गुरुनाथ पाटील, विनोद मढवी, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, अरुण म्हात्रे, राजेश पाटील, जगदीश भंडारी, सचिन चौबे, विनोद पाटील सर, सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *