अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे

 

ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकपोयोगी कमी केली त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे यांनी ठाणे येथे केले.
धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे रुचिका शिंदे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी ठाणे शहरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲड रुचिका शिंदे व माहेरचे वंशच प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक शंकर कोळेकर,समाजाचे जेष्ठ दिलीप कवितके,बाबासाहेब दगडे,भीमराव जानकर,निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,महिला मंडळाचे अध्यक्षा माधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे ,खजिनदारअनिल जरग ,सल्लागार प्रसाद वारे, सूर्यकांत रायकर,सुनील राहिंज कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,सुरेश भांड,राजेश वारे,उत्तम यमगर,संतोष बुधे,संतोष दगडे,उद्धव गावडे,महेश पळसे,प्रवीण शेंडगे,रमेश गलांडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,सुषमा बुधे,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड, स्मिता गावडे आदी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण देशात विविध ठिकाणी मंदिराचा जिणोध्दार केला,रस्ते बांधले,बारव उभारल्या,नदी घाट बांधले,अन्नधत्र उभे केले असे लोकपयोगी कमी केली.त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले.त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असे मार्गदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे यांनी उपस्थितांना केले.त्याकाळी कोणताही प्रकराची साधन सामुग्री उपलब्ध नसताना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य एक आदर्श आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यांचे विचार अनुकरण केल्यास त्यांनादेखील त्यांचा पुढील आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल असे यावेळी ॲड रुचिका शिंदे म्हणाल्या .
समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचे गौरव उद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांनी काढले धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य कौतूकास्पद असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *