राजेंद्र साळसकर
मुंबई : मालवण येथील शिव पुतळ्या वरून संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण दूषित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराची जाहीर माफी मागितली व छत्रपती आमचे दैवत असल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिपादन करूनही महाराष्ट्रात अराजक व्हावे व सरकारला बदनाम करण्याचे हेतूने आज महाविकास आघाडी तर्फे आज जोडे मारो आंदोलन जाहीर झाल्याचे निषेधार्थ माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज भाजप युवा मोर्चा उत्तर मुंबई चे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते व शिवप्रेमी जनतेला बरोबर घेऊन बोरीवली पूर्व टाटा पॉवर येथील शिवप्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून शिवरायांची पुन्हा एकदा माफी मागून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. या प्रकारचे राजकारण न करता सगळ्यांना एकत्र येऊन एक सन्मानजनक शिवरायांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे प्रतिपादन शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले. छत्रपती शिवजी महाराज हे कोणत्या पक्षाचे राजे किंवा नेते नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे राजे होते. यात कोणीही घाणेरडे राजकारण करू नये असेही आवाहन केले व आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाचा जाहीर निषेध केला.
या प्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष अमर शाह आणि भाजप सचिव प्रकाश दरेकर यांचीही भाषणे झाली.
याप्रसंगी भाजप चे पदाधिकरी कार्यकर्ते माजी नगरसेवक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर अनुसरण करणारे शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
00000
