डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील पाणउतार (जेट्टी) जवळील कांदळवन नष्ट करून तेथे मातीचा भराव टाकणाऱ्या

अज्ञात भूमाफियांच्या विरुध्द महसूल डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी जमीन महसूल, पर्यावरण संवर्धन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा पाणउतार परिसर (जेट्टी) हा एकमेव कांदळवनाचा हरितपट्टा शिल्लक आहे. मोठागाव, कोपर, गणेशनगर भागातील कांदळवन भूमाफियांनी बेकायदा भराव करून, त्यावर चाळी बांधून, वाळू तस्करांनी रेती उपसा करून नष्ट केला आहे. फेब्रुवारीमध्ये देवीचापाडा खाडी किनारी पाणउतार भागात (जेट्टी) पालिका, महसूल विभागाच्या परवानग्या न घेता भूूमाफियांकडून डम्परद्वारे मातीचे भराव टाकण्याचे काम अहोरात्र सुरू करण्यात आले होते. हे भराव टाकण्यापूर्वी या भागातील कांदळवनाची झाडे तोडण्यात आली. काही जाळून नष्ट करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *