विश्वास गायकवाड

 

बोरघर / माणगाव : रायगड जिल्हा परिषद अलिबाग विभागांतर्गत  माणगाव पंचायत समितीच्या ‘सहाय्यक प्रशासन अधिकारी’ या पदावर कार्यरत असणारे राजाराम अनंत मोरे यांच्या आजवरच्या प्रशासकीय कार्याची रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन त्यांची माणगाव पंचायत समिती कार्यालय येथे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ पदावर नियुक्ती करून बढती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे रायगड जिल्हा परिषद व माणगाव पंचायत समिती कार्यालय,कौटुंबिक आप्त परिवार, मित्र परिवार आणि सामाजिक स्तरातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
राजाराम मोरे हे ८ जानेवारी १९९० रोजी माणगाव पंचायत समिती येथे रुजू झाले होते, आणि आता त्याच ठिकाणी त्यांना ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर बढती देण्यात आली आहे. राजाराम मोरे यांना प्रथम पदोन्नती हि १० ऑक्टोबर २००३ मध्ये बालविकास प्रकल्प विभागात मिळाली होती तर दुसरी पदोन्नती हि १ फेब्रुवारी २०१३ मध्ये म्हसळा पंचायत समिती येथे ‘कनिष्ठ प्रशासन अधिकारी’ या पदावर देण्यात आली होती. तसेच राजाराम मोरे यांनी सुधागड पाली पंचायत समिती येथे देखील रोखपाल पदावर काम केले आहे. एकंदरीत राजाराम मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागात देखील काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे कार्य कुशल आणि समाधानकारक प्रशासकीय कामकाज पाहता प्रशासकिय दृष्टिकोनातून त्यांना ही एक संधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पंचायत समिती माणगाव आता पर्यंतच्या कार्यकाळात सहाय्यक प्रशासन अधिकारी यास प्रथमत सहाय्यक गट विकास अधिकारी ह्या पदावर श्री. राजाराम मोरे साहेबांच्या रूपाने संधी मिळाली याचा समस्त माणगाव करांसह रायगड जिल्ह्यास आनंद होत आहे.   राजाराम मोरे हे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर 2 सप्टेंबरला हजर झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रशासकिय कामकाजाची जबाबदारी देखील वाढली असून ते या पदाला निश्चितच योग्य तो न्याय देतील यात शंका नाही. त्यांचा मित्र परिवार आणि   हितचिंतकांकडून त्यांना सोशल मीडियाच्या वॉट्सअप, फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटून त्यांना अभिनंदनपर शुभेच्छा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *