राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखरुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख,हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. महिला व मुलींबाबतच्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,फॉरेस्ट, विद्युत कंपनी, औद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालया संदर्भातील विविध जनहितार्थ मुरबाडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली.
00000
