मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक ७ एप्रिल रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ७, एप्रिल रोजी ठीक १२:00 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे आयोजित केली आहे.
या विशेष सर्वसाधारण सभेत चौवार्षिक (२०२४ ते २०२८) निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. या सभेला सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहण्याचे आव्हान चंद्रजीत जाधव – सहसचिव, भारतीय खो खो महासंघ व गोविंद शर्मा – सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी केले आहे.
या सभेला सुधांशु मित्तल (अध्यक्ष – भारतीय खो खो महासंघ) व एम. एस. त्यागी (महासचिव – भारतीय खो खो महासंघ) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो खो महासंघ) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन) हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
