डीटीडीसीने विजेतेपद राखले

ठाणे : एकतर्फी लढतीत डीटीडीसी संघाने रूट मोबाईलचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील या गटाचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले .रूट मोबाईल संघाला ९२ धावांवर गुंडाळल्यावर डीटीडीसी संघाने २१.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात ९६ धावा करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. अजित यादवचा अष्टपैलू खेळ डीटीडीसी संघाच्या विजयाचे वैशिष्टय ठरले.

अंतिम लढतीत नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय  रूट मोबाईल संघाला फायदेशीर ठरला नाही. अजित यादवने ५.३ षटकात अवघ्या १२ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीचा कणा मोडला. तर श्रेयस गुरवने तीन बळी मिळवले. आयुष वर्तकने ३२ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.  उत्तरादाखल सत्यलक्ष जैनने नाबाद ४९ आणि फलंदाजीतही छाप पाडताना अजितने नाबाद २३ धावा करत डीटीडीसीला विजयी केले.स्पर्धेतील विजेत्यांना मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अभय हडप, रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघासाठी देण्यात येणारे प्रभाकर गुजराथी पारितोषिक सॅटेलाईट संघाला देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : रूट मोबाईल  : २८.३ षटकात ९२ (आयुष वर्तक ३२, अजित यादव ५.३ -०-१२-६ ) पराभूत विरुद्ध डीटीडीसी :२१.४ षटकात ३ बाद ९६ (अजित यादव नाबाद २३, सत्यलक्ष जैन नाबाद ४९ ) सर्वोत्तम फलंदाज – आयुष वर्तक (रूट मोबाईल), सर्वोत्तम गोलंदाज –  श्रेयस गौरव (१६-४-४८-१० (डीटीडीसी),सर्वोत्तम अष्टपैलू – आयुष वर्तक ( रूट मोबाईल), विशेष उल्लेखनीय कामगिरी – आर्यराज निकम (मुंबई पोलीस अ संघ ).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *