मुंबई : बँक ऑफ इंडियाने आज त्यांच्या सर्व शाखांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये नवी मुंबई झोन विशेषत: सहभागी झाला होता. या कार्यक्रमात क्षेत्राचे झोनल मॅनेजर अतुल सातपुते यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय व्यवस्थापक महेश कानविंदे यांनीही संबोधित केले.
दक्षता विभागाचे मुख्य व्यवस्थापक किशोर राम गेहलोत यांनी ग्रामसभेच्या आयोजनामागच्या उद्देशावर प्रकाश टाकला आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सर्वांनी उपाययोजना सांगितल्या. विक्रम सिंह व आलोक कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच बँक ऑफ इंडिया भिवंडी शाखेचे मुख्य शाखा प्रबंधक विजय कुमार सिंह यांनी नवसंजीवनी लोकसंचालीत साधन केंद्र, गाव -शेलार , तालुका -भिवंडी येथे महिला बचत गटांना बँकेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली व विविध फसणुकीपासून सावध राहण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रमात आमदार महेश चौघुले यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आणि सर्व सामान्यना संवेदनशील बनवणे आणि सुरक्षित बँकिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे हा होता.