काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीने शुक्रवारी मुंबईत आझाद मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष संजय पवार,जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन आठवले, महिला आघाडीच्या आरती सचिन आठवले,तालुकाध्यक्ष अशोक किर्तीकर, १९४ चे वार्ड अध्यक्ष अनिल ह. कांबळे आदींसह आरपीआयचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.