भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : गरजू विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी महत्वाचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयातही सुरू झाले आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये `आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले. या महाविद्यालयांमध्ये ठाण्यातील वागळे इस्टेटमधील केबीपी महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्रांमधून कौशल्य विकास कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आमदार निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, भविष्यातील प्रगतीसाठी कौशल्य विकासाचे धडे घेण्याचे आवाहन केले.
आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे व प्राचार्य संतोष गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केबीपी महाविद्यालयातील केंद्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी, अकाऊंट असिस्टंट, डिजिटल मिडिया मॅनेजमेन्ट, वेब डेव्हलपमेंट आणि इतर अनेक कोर्सेस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक व २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
00000