ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रमजान सणानिमित्त रविवारी, ‘हिदू मुस्लिम एकता इफ्तारी-२०२४’ चे आयोजन करण्यात आले.
सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदू मुस्लीम सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपेसाहेब व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी व माझे सहकारी उमेर फारुकी यांच्यातर्फे इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने एकच संदेश आहे, या देशात, या राज्यात सर्व हिंदू मुस्लीम एकत्र आहेत, अशी प्रतिक्रिया ठाणे परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख यांनी व्यक्त केली.
अजितदादा यांनी जपलेल्या शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा कायम ठेवून दिवाळी सण साजरा करताना जसे नजीबभाई, मोहसीनभाई व पक्षाचे मुस्लीम सहकारी सहभागी होतात तसेच रमजान सणानिमित्त आयोजित इफ्तारी पार्टीतही आम्ही हिंदू-मुस्लीम सर्व सहकारी एकत्र सहभागी झालो आहोत. प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपेसाहेब व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लासाहेब यांची एकी लोकांना दिसून येते. त्याचप्रमाणे आम्ही सर्व हिदू मुस्लिम सहकारी एकत्रपणे सण साजरे करतो आणि पक्षाचे कामही एकत्र करत आहोत, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदेश पाटील यांनी व्यक्त केले.
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) सेक्रेटरी उमेर फारुकी यांच्या आयोजनाखाली, रमजान सणानिमित्त ‘हिंदू मुस्लीम एकता नजीब मुल्ला इफ्तारी २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, डाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदेश पाटील, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष प्रा. हुसैन मणियार, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, अजित सावंत, महिला विधानसभा अध्यक्षा सौ. वंदना खानोलकर, सौ. अरुणा पेंढारे, सौ. सुवर्णा खिल्लारी तसेच मोठ्यासंख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लीम व हिंदू बांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.