रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे

ठाणे : ठाणे पूर्व कोपरी येथील दौलत नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीचा विकास `क्लस्टर’च्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे.`क्लस्टर’ विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल  इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे. या अपप्रचाराला उर्वरित २०० सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत, असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले.
पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश करणा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते.
दौलत नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे. सोसायटीला 2002 पासून C 1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटीसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरुन धोकादायक इमारतीत राहत आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलेपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे.
मे. यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने DDR च्या उपस्थितीत केली आहे. त्यांनतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिलेली आहे.  क्लस्टरला एकमताने  मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी LOI आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करुन ते कार्य करत आहेत. कमिटी आणि सभासादांचा मे. यश अशोका डेव्हलपरला दौलत नगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलत नगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करुन कायदेशीर बाबी पूर्ण करुन काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर अनेक सुविघा मिळून संपूर्ण दौलत नगर रहिवाश्यांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी आम्ही मे. यश अशोकाचे आभारी आहोत, असे सचिव महेश करणा यांनी सांगितले.
क्लस्टर योजने अंतर्गत बिल्डरने 25 टक्के वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे. परंतु मे. यश अशोका बिल्डरकडून 32 टक्के वाढीव क्षेत्र मंजूर करुन घेतले आहे. सध्याच्या परिस्थितीत दौलत नगर मधील सर्व इमारती निकसीत (रिकाम्या) केल्या नसताना मे. यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे फ्लॅटधारक फ्लॅट खाली करून गेले आहेत त्यांना भाडे देत आहे. आज काही मुठभर सभासद सदर डेव्हलेपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने इतर सभासदांना एका नामांकित बिर्ल्डरला अर्धवट व चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलत नगरचा डेव्हलपमेंटचे काम करण्यात इच्छुक आहेत, असे सांगत आहेत. पंरतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलत नगरच्या डेव्हलेपमेंटचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. काही रहिवांशानी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत व अश्याप्रकारे बऱ्याच बेकायदेशीर गोष्टीची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करुन निरर्थक कलह निर्माण करत आहेत.
आज हे विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मिटींगला हजर होते. त्याच रहिवाशांनी इतर रहिवाश्यांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती. त्याचे पुरावे फोटोज आणि व्हिडीओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत. आज प्रसार माध्यमातून वैभव भोसले यांचे असे म्हणणे आहे की आमच्या सोसायटी चां पुनर्विकास क्लस्टरअंतर्गत होत आहे याची कल्पना आज आम्हाला मिळाली, पण  २६ नोव्हेबर २०२३ च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असे व्यक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदासमोर सोसायटी च्या विशेष सर्वासधरण सभेत केले आहे सोसायटीच्या एसजीएममध्ये दौलत नगरची डेव्हलेपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झालेले आहेत. शोभा नारवानी यांनी विकासक मे. यश अशोका  यांचे स्वागत केले आणि सदर क्लस्टर डेव्हलेपमेंटसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच सोसायटीचे सभासद व प्राध्यापक श्री अल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीने सदर क्लस्टर योजना मान्य असल्याचे सांगितल्याचे  व्हिडीओ चित्रीकरणात दिसत आहे. याच मिंटीगमध्ये चेअरमन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केले असल्याचे घोषित केले व सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मिंटीगची सांगता केली, तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले व तसेच व्हिडिओ चित्रीकरणात दिसून आले.
त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची व प्रसार माध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा व स्वतःचा हेतू साधण्याचा प्रयत्न हे विघ्नसंतोषी लोक करत आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *