ठाणे : जिल्हाध‍िकारी व जिल्हा निवडणूक अध‍िकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार   २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघामधील २५३० मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आज दि.07 एप्रिल 2024 रोजी राम गडकरी  रंगायतन, ठाणे येथे ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व समर्थ विद्यालय, ठाणे येथे ईव्हीएम हँण्डस् ऑन ट्रेनिंग संपन्न झाले.

या प्रशिक्षणाकरीता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 63%  इतकी होती. हे प्रशिक्षण दोन टप्यात घेण्यात आले.  सकाळी 10:00 ते1:00 व दुपारी 02:00 ते 05:00 या दोनही वेळांमध्ये ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व ईव्हीएम हँण्डस्ऑन ट्रेनिंग देण्यात आले.  दोनही प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी / कर्मचारी यांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फलक / हजेरी नियोजन फलक लावण्यात आले होते.  तसेच वैद्यकीय पथकाची देखील प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपलब्धता होती.  येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या पार्किंगसाठी दोन्ही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. राम गणेश गडकरी रंगायतन हॉल येथे प्रशिक्षणासाठी पेंडॉल टाकण्यात आलेला होता.या पेंडॉलमधील मतदान अधिकारी/कर्मचारी यांना उन्हाळयाचा त्रास होवू नये म्हणून कुलर व फॅनची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली होती. तसेच  प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात येऊन चहा बिस्कीटचीही व्यवस्था करण्यात आलेली होती.  एकंदरीत प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेले होते.  तसेच ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण उर्मिला पाटील,

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ठाणे उपविभाग, ठाणे  यांनी स्वत: अतिशय साध्या  व सोप्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे दिले.  त्यामुळे मतदान अध‍िकारी कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *