मुंबई : शिवसेना भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या सौजन्याने शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बाटलीबॉय कंपाऊंड, फेरबंदर, भायखळा पूर्व येथे महिलांसाठी होम मिनिस्टर या आवडत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक बक्षिसे देखील ठेवण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाला मुख्य सूत्रसंचालन करण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिगंबर नाईक उपस्थित राहणार आहेत. सर्व सहभागी महिलांना एक विशेष पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांनी केले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी स्थानिक शिवसेना शाखेत संपर्क साधावा.
