राजेंद्र साळसकर
मु़ंबई – श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील समाधी मंदिर विकास कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ६६.११कोटी निधी मंजुर झाला आहे. या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्या नुसार विकासकामाचे भूमिपूजन शुक्रवार ४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सुदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथे होणार आहे. सदर मिटिंगमध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे अध्यक्ष मधुकर नेराळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा मुंबईत घेण्यात आली होती. यावेळी दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत , सुभाष कसाबे, विजय निगडकर तसेच समाज इतर मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते.
या भूमीपूजन सोहोळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख दिलीप खोंड यांनी सर्व तेली समाज बांधवांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
