जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त
बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ऍण्ड रिसर्च, डोंबिवली असोसिएशनचा संयुक्त कार्यक्रम
डोंबिवली : जागतिक फार्मासिस्ट दिन डोंबिवली शहरात साजरा करण्यात आला. बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ फार्मसी सत्कार, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त अभिमन्यूजी काळे यांच्या हस्ते नीरज इंगळे, सुनंदा बिराजदार, तलाक्षी छेडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, मल्हार नार्वेकर सीईओ, जॉन डिसोझा प्राचार्य, शिक्षक वृंद डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी फार्मासिस्ट उपस्थित होते. कॉलेज कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन यावेळी अभिमन्यू काळे, निलेश वाणी, संजू भोळे, विलास शिरुडे, राजेश कोरपे अन्य पदाधिकारी कॉलेजचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने माजी आयुक्त अभिमन्यू काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
