चौकशी समितीच्या अहवालात ठपका

राजन चव्हाण

सिंधुदुर्ग  सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत कामचुराकरपणा झाल्याचा ठपका या पुतळा कोसळल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशसमितीने ठेवलाय.

२६ ऑगस्टला छत्रपतींचा हा पुतळा उभारणीनंतर अवघ्या ९ महिन्यात कोसळला होता.   या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आपला १६  पानी अहवाल, राज्य सरकारकडे सादर केला आहे. गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचंही अहवालात उल्लेख आहे.

भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमांडर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.  दरम्यान हा अहवाल आल्यानंतर, राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मालवण छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात  आला आहे. या रिपोर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण यामध्ये समोर आले आहे. तसेच  देखभाल योग्य पद्धतीने न झाल्यानेच पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असे म्हटले आहे.  यामध्ये प्रामुख्याने  पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता, चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग  या पुतळ्याचा करण्यात आलं होतं.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डिझाईन योग्य पद्धतीने  तयार करण्यात आली नसल्याचं अहवालात तज्ज्ञांनी म्हटले आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे. पुतळा पडण्याची अनेक कारण या तज्ञ मंडळींनी  नमूद केली आहेत मात्र त्यातील प्रामुख्याने  काही कारणे समोर आली आहेत.

उदय सामंतानी दिलेल्या माहितीनुसार,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल योग्य पद्धतीनं केली नाही त्यामुळे पुतळ्याला आतून गंज चढला होता.  तसेच डिझाईनमधे अनेक चुका होत्या.  वेल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी चुका होत्या. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *