संभाजीराजेंनी पक्षफुटीवरून उडवली खिल्ली
छत्रपती संभाजीनगर : “भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती, काँग्रेसच काही वेगळंच सुरू होतं. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असं झालंय”, असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीची खिल्ली उडवली. ते संभाजीनगरमधील तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केलाय. गड किल्ल्यांना ७५ वर्षात किती पैसे दिले सांगा, माझं चलेंज आहे. ३५० गड कोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता , रायगड मी अध्यक्ष झालो म्हणून काही करू शकलो. राजकोट किल्ल्यात महाराजांचा पुतळा उभा राहिला, मी मोदीजींना पत्र लिहले घाई गडबडीत पुतळा उभारला असे लिहले. पुतळा बदला असे सांगितले. डिसेंबरमध्ये मी पत्र लिहले होते त्यावर कुणीही बोलले नाही.
राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला हिनवले जाते भाजप बी टीम आहोत म्हणून, पण आम्ही जात धर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलोय. आम्हाला वोट कटिंग मशीन म्हणता, पवार साहेब या राज्यातील शेतकऱ्यांचे कारखाने विकल्या जात असताना त्याच भांडवल भाजपने केले. त्यांच्या नातवाने सुद्धा संभाजीनगरचा कारखाना हाणला आहे. तुम्हीही तेच केलं. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असं सगळं सुरुय, मात्र हा सातबारा कष्ट करी जनतेचा आहे.असेही ते म्हणाले.
