मुंबई : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव पवन असल्याचं सांगितलं होतं. ताडदेव पोलिस आता पुढील तपास करत आहेत.
हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्यास सांगितले. दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्ब स्फोट केला जाईल. बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा फोन हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयीन फोनवर आला होता. तसेच आरोपीने फोनवर स्वत:चं नाव पवन असे सांगत अर्वाच्च शिवीगाळ या प्रकरणी हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कलम 351(2), 352, 353(2), 353(3), भादवी 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहेत.
