ठाणे : ‘बाळूचे व्यावहारिक नाव संतोष होते याचा आज अनेक मित्रांना शोध लागला. कुडाळकर कुटुंबीय चेंदणी कोळीवाड्याशी एकरूप झाले. क्रिकेटआणि समाजसेवा म्हणजे बाळूच्या जिवनाची दोन अविभाज्य अंगे होती.मित्रासाठी तन, मन आणि धनाशी जोडला गेलेला बाळू मित्रांचाही मित्र होता. तो अजातशत्रू होता’, असे भावनिक मनोगत ठाण्याचे जेष्ठ समाजसेवक डॉ गिरीश साळगावकर यांनी व्यक्त केले. ठाणे आणि मुंबईच्या मैदान क्रिकेटमध्ये बाळू या नावाने परिचित असणाऱ्या संतोष कुडाळकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
राजश्री मित्र मंडळ व कोळीवाडा समाज मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सायंकाळी कोळी समाज मंदिराच्या सभागृहात संतोष तथा बाळू कुडाळकर यांच्या स्मरणसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ गिरीश साळगावकर बोलत होते.श्री आनंद भारती समाज संस्थेचे जेष्ठ सदस्य केसरी नारायण कोळी या स्मरणसंध्येच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बाळू याच्या पत्नी समृद्धी, मुलगा सोहम आणि जेष्ठ बंधू रवींद्र कुडाळकर उपस्थित होते.
याप्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक किरण साळगावकर, प्रशांत बोथरे, प्रल्हाद नाखवा, प्रफुल्ल कोळी, विवेक मोरेकर, जयेश कोळी, सुरेंद्र कोळी यांनी बाळू कुडाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.मनीष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र कुडाळकर यांनी कुटूंबियातर्फे आभार मानले.
0000
