ठाणे : मुंबई येथे नामांकित ओ. एन. सी. जी. कंपनीमध्ये कार्यरत असलेले ठाण्याचे सुपुत्र कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सहाय्यक पोलिस आयुक्त रेहाना शेख, अभिनेते जयंत ओक, साहित्यिक व कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष मेघा महाजन, श्रीराम महाजन, अनघा जाधव आदी उपस्थित होते. चिव्हाणे यांना लहानपणापासून कलेची आवड आहे. मूर्तिकला, चित्रकला, चित्रकला मॉडेल बनविणे आदी कार्यशाळा आयोजित करतात. त्यांनी अनेक कलावंतही घडविले.
