डॉ. सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली
माथेरान येथे वाहतुकीच्या घोड्यासाठी विशेष कार्यमोहिम
माथेरान : माथेरान येथे शुक्रवारी पशुवैद्यकीय दवाखाना माथेरान, पशुसंवर्धन विभाग-रायगड तसेच पिपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स- इंडिया व रहात हया सेवा भावी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीची घोड्यांसाठी विशेष कार्यमोहिम आयोजित करण्यात आलेली होती. सदर विशेष कार्यमोहिम ही, पशुसंवर्धन उपआयुक्त , जिल्हा रायगड डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद रायगड डॉ. शामराव कदम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन- कर्जत, डॉ. गिरीश बारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.सदर विशेष कार्यमोहिमेमध्ये माल वाहतुकीची वापरले जाणारे घोडे व इतर घोडे असे एकूण १४३ घोडे यांची सविस्तर आरोग्य तपासणी, औषधउपचार, जंतनिर्मूलन , लसीकरण व इतर करण्यात आले आहे.
सदर विशेष कार्यमोहिमेस रहात हया सेवा भावी संस्थेचे डॉ. राकेश चिटोरा , डॉ. आकाश जाधव , पेटा-इंडिया हया संस्थचे महेश त्यागी व त्यांचे इतर सहकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती कर्जत डॉ. मिलिंद जाधव, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना माथेरानचे डॉ.अमोल कांबळे, ड्रेसर राम तिटकारे व इतर यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदर कार्यमोहिमेत, अश्र्वपालक यांना जंतनिर्मूलन, लसीकरण चे महत्व व इतर विषयांवर सविस्तर मार्गदर्शन ही करण्यात आले आहे. स्थानिक अश्वपालक यांनीही सदर विशेष कार्यमोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे.
