पनवेल : परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील श्लाघ्यता राजेश ठाकूर या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून साडेचार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे..
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. श्लाघ्यता ही एमबीबीएस हे वैद्यकीय शिक्षण जॉर्जिया या देशातील ईस्ट युरोपियन युनिव्हर्सिटीमध्ये घेणार आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार तिला मदत करण्यात आली आहे.
