सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून छत्रपती पुरस्कारार्थी कबड्डीपटू छाया देसाई पवार उपस्थित होत्या. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अवधूत भणगे, सचिव योगेश फणसळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष एकेरी गट तिसऱ्या फेरीचे निकाल.
ओमकार नेटके ( मुंबई ) वि वि मनोज सप्रे ( रत्नागिरी ) २५-११, १-२०, २५-१२
दिलेश खेडेकर ( मुंबई ) वि वि ओम पारकर ( रत्नागिरी ) २५-११, २४-१५
संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि विनोद बारिया ( मुंबई ) २१-७, २५-१८
प्रफुल मोरे ( मुंबई ) वि वि अमित कदम ( मुंबई ) २५-१, २५-०
संजय मणियार ( मुंबई उपनगर ) वि वि ब्लेसिंग सॅमी ( ठाणे ) २५-२, १९-३
कुणाल राऊत ( मुंबई ) वि वि प्रकाश गोसावी ( मुंबई उपनगर ) २५-११, २४-२०
प्रकाश गायकवाड ( पुणे ) वि वि अमोल सावंत ( मुंबई ) २४-०, २३-१
योगेश परदेशी ( पुणे ) वि वि मिलन पांचाळ ( मुंबई उपनगर ) २५-३, २५-०
परविंदर सिंग ग्रोव्हर ( मुंबई ) वि वि रुद्र चव्हाण ( सिंधुदुर्ग ) २५-०, २५-१६
नरसिंगराव सकारी ( मुंबई उपनगर ) निलेश परब ( मुंबई ) २५-१, २५-५
00000
