इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा
मुंबई: थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा शशांक पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, फिलीपीन्स, बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, केनिया अशा 11 देशांच्या स्केटर्सनी सहभाग दर्शवला. दादर येथील आयईएस ओरायन स्कूलमध्ये पहिलीमध्ये शिकणार्या ज्येष्ठाने सुरुवातीला छंद म्हणून स्केटिंग शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्पीडएक्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. सध्या मेहमूद सिद्किी यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर खूप मेहनत घेत अल्पावधीत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात जेष्ठाने सुरेख छाप पाडली आहे.
00000
