रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनतर्फे
ठाणे : सामाजिक जबाबदारीम्हणून समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन तर्फे ठाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा ई लर्निग अँपचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आदिवासीबहुल शहापूर तालुक्यातील चंद्रोटी येथील माउली विभाग माध्यमिक विद्यालय, ठाणे महापालिकेची शाळा क्रमांक सहा आणि सातसह विद्या प्रसारक संस्थेतील सुमारे १९७ विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता उंचावण्यासाठी हे ई लर्निग अँप वितरित करण्यातआलेअसल्याचे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनचे अध्यक्ष उदय दाभाडे यांनी सांगितले.
यासंदर्भात रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनचे अध्यक्ष उदय दाभाडे म्हणाले, रोटरीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. शैक्षणिक गुणवत्ता कुठल्या एका वर्गातल्या मुलांकडे असते असे नाही. समाजातील निम्न स्तरातील विद्यार्थी गुणवत्तावान असतात. गरज असते ती त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची. त्यामुळे काही हजार रुपये किंमत असणारे हे ई लर्निग अँप वितरित करण्याचा आम्ही निर्णय घेतला.या ई-लर्निग अँपमध्ये दहावीचा अभ्यासक्रम, सर्व प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासक्रम समजवून सांगण्यात आला आहे. त्यामुळे या मुलांना शाळांत परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात मोठी मदत होणार आहे.
याशिवाय रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनतर्फे डिस्ट्रिक्ट ग्रॅण्ट उपक्रमांतर्गत माहुली विभाग माध्यमिक विभाग शाळेत ८ वि ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य, विज्ञान विषयाची प्रयोगसाहित्य , पाणी शुद्धीकरण यंत्र, प्रिंटरसह प्रोजेक्टर जोडणीसह संगणक, स्क्रीन देण्यात आला असल्याचे उदय दाभाडे यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनचे मेंटॉर आणि डिजीएन डॉ निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यध्यापक अरुण घोडविंदे, शाळेचे विश्वस्त अंधारे आणि रोटरीचे अनेक सदस्य उपस्थित होते.
00000
