सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानला १८-१६, ७-२५, २५-१९ असे पराभूत केले. तर दुसरीकडे महिलांच्या उप उपांत्य फेरीत युथ राष्ट्रीय विजेती ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर २३-१, १०-२५ व १८-१५ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
झैद अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि योगेश परदेशी ( पुणे ) १८-२४, १९-७, २५-१८
पंकज पवार ( मुंबई ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) १३-२५, २०-११, २५-११
संजय मांडे ( मुंबई ) वि वि प्रकाश गायकवाड ( पुणे ) २५- ६, २३-०
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ) १७-१६, २५-५
काजल कुमारी ( मुंबई ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २५-४, २५-७
मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २५-१३, २५-१७
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *