विद्यार्थ्यांना अवकाशासंबंधी मार्गदर्शन – सचिन मोरे
ठाणे : आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणे, अवकाश संशोधनाप्रती गोडी निर्माण करणे व विविध उपकरणांच्या माध्यमातून प्रत्यक्षिके करण्याच्या उद्देशाने सदर अवकाश केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. ठाणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अवकाश केंद्र भेट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी दिली. आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते उदघाट्न सोमवारी ३० सप्टेंबर रोजी संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.
हेन्कल अढेसिव्ह टेक्नॉलॉजि प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रायोजकतेतून व ग्लोबल मिशन अस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अवकाश निरीक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हेन्कलच्या माध्यमातून याआधी असे ११ केंद्र पुणे व नवी मुंबई येथे सुरु करण्यात आले आहेत. ठाण्यातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र आदर्श इंग्लिश स्कुल मध्ये सोमवारी ३० सप्टेंबर रोजी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु करण्यात आले. याप्रसंगी हेन्कल लिमिटेडचे मुख्य आर्थिक अधिकारी कृष्णा प्रसाद, ग्लोबल मिशनचे प्रमुख डॉ. प्रसाद खंडागळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीरा कोर्डे व आदर्श विकास मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त श्रद्धा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, हेन्कल लिमिटेडचे अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0000000
