ठाणे : दैवज्ञ ब्राह्मण समाज ठाणे या संस्थेच्या वतीने काल रविवार, 29 सप्टेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे नाना शंकर शेट यांचे १५९ वे पुण्यस्मरण आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष उल्हास दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या दोन मुख्याध्यापिका यावेळेस उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने दैवज्ञ ज्ञाती बंधू आणि विद्यार्थी पालक यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर पाहुण्यानी विद्यार्थ्यांना यावेळीं मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नाना शंकर शेट यांच्या सह देवतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेच्या महिला कार्यकर्त्या प्रगती पोवळे आणि माधुरी खेडेकर यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आलं. व्यासपीठावरती अध्यक्ष उल्हास दांडेकर यांच्यासह सौ. माधुरी गिरीश नगरकर माजी उपप्राचार्य वझे केळकर कॉलेज मुलुंड आणि सौ. सायली संजीव गोरे माजी मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग राधाबाई मेघे विद्यालय नवी मुंबई.तसेच अखिल भारतीय दैवज्ञ समाजन्योती परिषदेचे सरचिटणीस आणि दैवज्ञ संदेश चे संपादक शेखर दाभोळकर तसेच महिला समितीच्या अध्यक्षा करुणा आर्यमाने वधुवर समितीच्या अध्यक्ष पल्लवी श्रीमणी या उपस्थित होत्या. सेक्रेटरी अजित गोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर पूजा पोसरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी उपखजिनदार गजानन मानकामे महिला उपाध्यक्ष स्वप्नाली कल्याणकर, महिला समिती सदस्या रंजना सिरसागर, जूतिका कोटकर,प्रिया मानकामे ,अनिता वेदपाठक आणि कार्यकारणी सदस्य प्रसाद पोसरेकर, राजेंद्र देहेरकर यानी मेहनत घेतली. यावेळी अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे खजिनदार दिलीप मालणकर उपस्थित होते त्यांचाही यावेळेस पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.