रमेश औताडे

 

मुंबई : आपण कोण आहोत आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करून त्याप्रमाणे कृती करावी इतर लोक आपल्याला काय बोलतील इतर आपल्याविषयी काय विचार करतील याचा विचार न करता आपण आपल्या मताप्रमाणे स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी सांगितले.
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांताच्या वतीने महिला साहित्यिक संमेलनाचे आयोजन विवेकानंद संकूल,नवी मुंबई सानपाडा येथे दिमाखात संपन्न झाले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव व लेखिका स्वाती काळे उद्घाटक व प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संमेलनात कथा, कादंबरी, विनोदी साहित्य व काव्य या या साहित्य प्रकारावर नवोदित महिला साहित्यिकांनी सादरीकरण केले.
साहित्य संमेलनासाठी साहित्य भारतीचे अरुंधती जोशी प्रांत उपाध्यक्ष नवी मुंबई साहित्य परिषद मार्गदर्शक नंदकिशोर जोशी नितीन केळकर प्रांत संघटन मंत्री प्रवीण देशमुख कार्याध्यक्ष दुर्गेश सोनार प्रांताध्यक्ष द्विवेदी आनंद देशमुख ऋतुजा गवस संतोष जाधव संतोष मिसाळ कल्पना देशमुख ज्योत्स्ना चौधरी ज्योती जाधव त्याचप्रमाणे साहित्य भरतीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *