मुंबई : डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली आणि ७ रंग यांच्यातील परस्पर संबंध रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
या मैफिलीत व्हायोलिनवर डॉ. रतीश तागडे, मृदंगमवर श्रीधर पार्थसारथी, कीबोर्डवर अतुल राणिंगा, तबल्यावर ओजस अधिया, बासरीवर निनाद मुळोकर, गायकीवर गंधार देशपांडे, गायनावर शिवानी वासवानी आणि ड्रम्स वर वर प्रियाश पाठक आहेत. दुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, गझल, सूफी, वेस्टर्न जॅझ संगीत, कर्नाटक शास्त्रीय संगीत इत्यादी विविध शैलीतील प्रतिभावान संगीतकारांकडून हे एक सुंदर आणि शक्तिशाली संगीत सादरीकरण आहे. या मैफिलीमध्ये वाद्य जुगलबंदी, रिदमिक एन्सेम्बल्स, सोलो परफॉर्मन्स, जॅमिंग सत्रे, व्होकल ड्युएट्स देखील सादर करण्यात येतील. सादरीकरणाचे सूत्रसंचालन देखील आकर्षक असेल, ज्यामुळे प्रेक्षकांना सर्व ७ घटकांमधील जोडणीची संकल्पना समजून घेण्यास नक्कीच मदत करेल. प्रेक्षकांच्या अनोख्या आणि वेगळ्या व्हिज्युअल आणि संगीताच्या अनुभवासाठी वेगवेगळ्या संगीत ट्रॅकसाठी ७ वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशयोजना वापरल्या आहेत.
०००००