मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, आता सिनेट निवडणुकीच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया (मतदार नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंत) असंविधानिक आणि मर्यादित पद्धतीने राबविल्यामुळे या प्रक्रियेतून निवडून आलेल्या युवासेनेच्या दहा प्रतिनिधींना कायदेशीर सिनेट पदवीधर प्रतिनिधी म्हणून मान्यता करता येणार नाही. अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने न्यायालयात केली आहे. नोंदणी शुल्क, प्रक्रियेतील त्रुटी, आणि सत्ताधारी पक्षाच्या अतिरिक्त राजकीय हस्तक्षेपामुळे “विद्यार्थी” हा महत्त्वाचा घटक या प्रक्रियेतून वगळला गेला आहे, असा दावा करत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने हायकोर्टात धाव घेतली आहे.