ठाणे : प्रतिवर्षी ‘स्वच्छता पंधरवडा’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानात सर्वत्र साजरा केला जातो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वच्छता मोहीम संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे,या निमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शना खाली वॉर्ड क्र.14 मध्ये ठाणे महानगर पालिका अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबविण्यात येणार आहे .यानिमित्ताने तिसऱ्या टप्प्यात “ठाणे बदलते” ही संकल्पना घेऊन “उत्सव स्वच्छतेचा” हा उपक्रम वॉर्ड क्र. 14 मध्ये दिलीप बारटक्के मा. नगरसेवक मा. गटनेते यांचा मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. या निमित्ताने मंगळवार 1 ऑक्टोबरला सकाळी 6 वा,आई माताजी मंदिर, स्वा. सावरकर नगर येथे सफाई महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला,येणाऱ्या नवरात्री मध्ये रविवार 6 ऑक्टोबर, सायंकाळी 6 वा ‘उत्सव स्वच्छतेचा” या उपक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे या सफाई महिला कर्मचारी म्हणजेच “स्वच्छता देवीचा” सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने भगवा रंग दिवस व महाराष्ट्र डे साजरा होणार आहे.